कांद्याच्या बाजारभावात झाली आज मोठ्या प्रमाणात वाढ इथे बघा आजचे ताजे दर

नमस्कार मित्रांनो उन्हाळ कांद्याचे 49 हजार क्विंटल, पुणे बाजारात 8 हजार क्विंटल तर अहमदनगर जिल्ह्यात 05 हजार क्विंटलची आवक झाली.तर आज कांद्याला कमीत कमी 2500 रुपयापासून ते सरासरी 4500 रुपयापर्यंत दर मिळाला.

आजच्या पणन मंडळाच्या माहितीनुसार येवला बाजारात उन्हाळ कांद्याला सरासरी 03 हजार 500 रुपये, नाशिक बाजारात 3600 रुपये, लासलगाव बाजारात 3675 रुपये, सिन्नर बाजारात 3810 रुपये, संगमनेर बाजारात 03 हजार रुपये, चांदवड बाजारात 3700 रुपये, मनमाड बाजारात 3550 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 3751 रुपये दर मिळाला.

हे सुद्धा बघा : शिंदे सरकार ने दिली खुशखबर.! सरकार देणार आता 50 हजार नोकऱ्या येथे बघा लगेच अर्जप्रकिया

आज लाल कांद्याला बारामती बाजारात 3200 रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 3750 रुपये, धुळे बाजारात 3400 रुपये, साक्री बाजारात 3500 रुपये दर मिळाला. तर लोकल कांद्याला पुणे बाजारात 3850 रुपये आणि सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये 3100 रुपये दर मिळाला.

Leave a Comment