शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा.! आता शेतकऱ्यांना धान, मका खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी झाली मुदत वाढ

नमस्कार मित्रांनो शासकीय अनुदानित धान (धान) खरेदी योजनेत शेतकऱ्यांना रब्बी हंगामात उत्पादित भात आणि मका विकण्यासाठी तिसरी मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत ३१ मे पर्यंत होती.

 

हे सुद्धा वाचा राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी सरकाने घेतला हा निर्णय

 

त्यानंतर 20 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता ती ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत हजारो शेतकऱ्यांनी अद्यापही ऑनलाइन नोंदणी केली नसल्याने हजारो शेतकरी शासकीय केंद्रावर धान व मका विक्रीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे पणन महामंडळाने ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ऑनलाईन नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भंडारा जिल्हा मार्केटिंग अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.भंडारा जिल्ह्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.(भंडारा वार्ताहर) जिल्ह्यात दीड लाखांहून अधिक शेतकरी धानाचे उत्पादन घेतात. तसेच रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्रांवर आधारभूत किमतीवर धान विक्रीसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. या ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख ३१ मे होती. मात्र, मागील हंगामाच्या तुलनेत यंदा ऑनलाइन नोंदणी अपेक्षेप्रमाणे झाली नसल्याने सरकारने मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.आता ऑनलाइन नोंदणीची मुदत एक महिन्याने वाढवून ३१ जूनपर्यंत करण्यात आली आहे.त्यामुळे आता शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील धान विक्रीसाठी जवळच्या केंद्रावर नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केले आहे

Leave a Comment