LIC पॉलिसीवर कर्ज घ्यायचे असल्यास ऑनलाईन वा ऑफलाईन प्रक्रियेचा वापर करता येत असतो. ऑफलाइनसाठी LIC कार्यालयात जाऊन KYC कागदपत्रांसह अर्ज दाखल करता येणार. तर ऑनलाइनसाठी LIC ई सेवांसाठी नोंदणी करून खात्यात लॉगइन करा आणि कर्जासाठीचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा लागेल.
LIC पॉलिसी वर कर्ज घेतल्यास त्याची परतफेड करण्याचा कालावधी बराच मोठा असतो. हा कर्ज परतफेडीचा कालावधी किमान ६ महिन्यांपासून ते विमा पॉलिसीची मुदत पूर्ण होईपर्यंत असू शकतो. ( तसेच या कर्जावर दरमहा EMI भरावा लागत नाही जसे पैसे येतील तसे थोडे थोडे भरता येतात. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, यात वार्षिक व्याजाची भर पडत असते. तेवढे लवकरात लवकर तुम्ही कर्ज भरू शकता