नमस्कार मित्रांनो सोन्याची इच्छा दिवसेंदिवस वाढत आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोन्या-चांदीच्या किमतींवर परिणाम होतो. 2024 च्या अखेरीस सोन्याची किंमत 1 लाखांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज काही अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
हे सुद्धा वाचा लाडका भाऊ योजनेसाठी लागणारे कागदपत्र तरच मिळतील दहा हजार रुपये खात्यावर
वाढत्या जागतिक मंदीमुळे सोन्याचे भाव वाढतच आहेत. सध्या सोन्याचा भाव 73 हजारांच्या जवळ आहे. त्यामुळे या वर्षअखेरीस सोने एक लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. अनेक मध्यमवर्गीय कुटुंब सोन्यात गुंतवणूक करतात. याचा फायदा त्यांना होणार आहे. पण येत्या काही महिन्यांत ज्यांना त्यांच्या लग्नासाठी किंवा मौजमजेसाठी सोने खरेदी करायचे आहे त्यांना या किमतीचा धक्का बसू शकतो.