आता बँकेतून काढता येणार तुम्हाला फक्त पंधरा हजार रुपये.! आरबीआय घेतला मोठा निर्णय

आरबीआयच्या कारवाई अंतर्गत, उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील राष्ट्रीय नागरी सहकारी बँक आणि मुंबईतील सर्वोदय सहकारी बँक नावाच्या दोन बँका संकटात असून या बँकांमध्ये खाती असलेल्या ग्राहकांना त्यांच्या खात्यातून ठराविक रक्कम काढता येणार आहे. दोन्ही बँकांची ढासळलेली आर्थिक स्थिती पाहता आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.

भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी पैशाच्या देवाणघेवाणीवर हे निर्बंध लादण्याची जबाबदारी या दोन बँकांवर आहे. ज्याचा थेट परिणाम खातेदारांवर होणार आहे. याशिवाय पात्र ठेवीदार केवळ विम्याची रक्कम आणि DICGC कडून कमाल 5 लाख रुपयांचा दावा करू शकतात.