नमस्कार मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्स (DL) संबंधित नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. हे बदल १ जूनपासून लागू होणार आहेत.
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता तुम्हाला प्रादेशिक परिवहन कार्यालय किंवा आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. या बदलामुळे ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्याची प्रक्रिया बऱ्याच प्रमाणात सोपी होईल, असा विश्वास आहे.
इथे जाणून घ्या ड्रायव्हिंग लायसन्स नवीन नियम
सध्या ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्याची प्रक्रिया खूप मोठी आहे. त्यासाठी अधिक कागदपत्रेही लागतात. अनेक फॉर्म भरून अनेक कार्यालयांमध्ये जावे लागते. लांबलचक आणि किचकट प्रक्रियेमुळे परवाना आरटीओ कार्यालयात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे संपूर्ण देशाच्या रस्ते सुरक्षेवर परिणाम होतो. त्यामुळे, या उणीवा दूर करण्यासाठी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भारतातील सध्याच्या ड्रायव्हिंग नियमांमध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत.