नमस्कार मित्रांनो योजनेच्या दुसऱ्या टप्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात ज्या महिलांनी 1 ऑगस्ट पासून या योजनेत अर्ज केले आहे त्यांना पैसे मिळणार आहे.
हे सुद्धा बघा : आधारधारकांसाठी मोठी माहिती.! या नागरिकांचे आधार कार्ड होणार आता कायमचे बंद
सध्या ऑगस्ट महिन्याचे अर्जाची छाननी सुरु आहे तसेच दुसऱ्या टप्प्यात 45-50 लाख महिलांना पैसे मिळणार आहे.राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे हस्तांतर झाले आहेत.ज्या महिलांनी १० ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरले होते आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले होते त्यांना आतापर्यंत दोन हफ्ते आले आहेत.अशा महिलांना जुलै आणि ऑगस्टचे मिळून ३००० रुपये आले आहेत.आता त्यानंतर फॉर्म भरलेल्या म्हणजेच ३१ ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरणाऱ्या महिलांना एकूण तीन हफ्ते येणार आहेत.