शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! शेतकऱ्यांचा जमिनीला जोडला जाणार आता आधार नंबर इथे बघा पात्र शेतकरी

नमस्कार मित्रांनो राज्यातील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांच्या जमिनींना आता संबंधित जमीन मालकाचे आधार क्रमांक जोडले जाणार आहे.

त्यामुळे एका शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन, कोणत्या गावात आहे, याची एकत्रित माहिती गोळा होणार आहे.यातून राज्यातील वहिवाटीखालील शेतीची माहिती गोळा होणार आहे.

हे सुद्धा बघा : शिंदे सरकार करणार तुमच्या खात्यात दर महिन्याला दहा हजार रुपये जमा इथे बघा अर्ज प्रक्रिया

त्यामुळे राज्य सरकारला धोरणांची आखणी, अंमलबजावणी तसेच शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी होणार आहे.गेल्यावर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांचा आधार क्रमांक तसेच संलग्न बँक खात्याचा तपशील स्वतंत्र पोर्टलवर अपलोड करण्यात येत आहे. या आधारची आता यूआयडीएआयकडूनही पडताळणी केली जाणार आहे.एखाद्या शेतकऱ्याने आपले आधार एका गावातील कापूस व सोयाबीन लावलेल्या शेतीला जोडले आणि तेच आधार दुसऱ्या गावातील शेतीला जोडल्यास या दोन्ही क्षेत्रांची नोंद होणार आहे. त्यामुळे या योजनेतील लाभाच्या निकषानुसार दोन्ही क्षेत्र दोन हेक्टरपेक्षा जास्त असल्यास त्याची माहिती मिळेल.

यातून त्या शेतकऱ्याला केवळ दोन हेक्टरसाठीच मदत मिळणार आहे. मात्र, दोन्ही क्षेत्रांत मिळून दोन हेक्टरचे निकष पूर्ण होत असल्यासही त्या शेतकयाला पूर्ण मदत मिळणार आहे. त्यामुळे एकाच योजनेत दोनदा किंवा अनेकदा लाभ घेण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे.

हे सुद्धा बघा : शिंदे सरकार करणार तुमच्या खात्यात दर महिन्याला दहा हजार रुपये जमा इथे बघा अर्ज प्रक्रिया

Leave a Comment