नमस्कार मित्रांनो उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना आणि एलपीजी गॅस ग्राहकांना केंद्र सरकारमार्फत सबसिडी दिली जाते. प्रति सिलिंडर केंद्र सरकारकडून हे अनुदान दिले जाते.
सबसिडीची रक्कम योजनेशी संबंधित ग्राहकाच्या खात्यात थेट हस्तांतरित केली जाते. मात्र आता सरकारने उज्ज्वला योजनेच्या एलपीजी गॅस कनेक्शन ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता गॅस ग्राहकांना गॅस एजन्सीमध्ये जाऊन बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या ग्राहकांना अनुदान मिळणार नाही.
गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी त्वरित हे काम करा
सध्या केंद्र सरकार संबंधित गॅस एजन्सींमार्फत सर्व ग्राहकांना ही माहिती पुरवते. या अधिसूचनेनुसार, ज्या ग्राहकाच्या नावावर गॅस कनेक्शन आहे, त्यांना केवायसी पूर्ण करण्यासाठी गॅस एजन्सीच्या कार्यालयात जावे लागेल. त्यावेळी ग्राहकाकडे मोबाईल फोन आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. या कार्यालयात ग्राहकाचा बायोमेट्रिक अंगठा घेऊन एक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास सरकार गॅस सिलिंडरचे वितरण आणि अनुदान स्थगित करेल.