नमस्कार मित्रांनो राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. तर या निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारनेशेतकरी आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. मागील १० ते १५ दिवसांमध्ये राज्य सरकारने कॅबिनेट बैठकीमध्ये हजारो कोटींचा निधी मंजूर केला आहे.
तर मागील ३ ते ४ दिवसांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल ६ ते ७ हजार कोटी रूपये वर्ग करण्यात आले आहेत.गेल्या १० ते १५ दिवसांत राज्य सरकारने ठिबक सिंचन अनुदान, पीक विमा योजना, २०२३ खरीप हंगामासाठीचा प्रलंबित विमा, सोयाबीन-कापूस अनुदान योजना, २०२४ मधील अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना मदत, मागच्या रब्बी हंगामातील पीक विमा,
हे सुद्धा बघा : या तारखेपासून तरुणांच्या खात्यात दर महिन्याला मोदी सरकार देणार पाच हजार रुपये
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अशा योजनांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. यातील बहुतांश निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.कृषी आयुक्तालयातून मिळालेल्या माहितीनुसार केवळ ३ दिवसांमध्ये तब्बल ६ हजार ५०० कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला. सरकारने योजनेसाठी, विम्यासाठी आणि अनुदानासाठी संपूर्ण निधी उपलब्ध करून दिला असून शेतकऱ्यांनी संमतीपत्र दिल्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित निधीही शेतकऱ्यांना वर्ग करण्यात येत आहे.
हे सुद्धा बघा : या तारखेपासून तरुणांच्या खात्यात दर महिन्याला मोदी सरकार देणार पाच हजार रुपये