नमस्कार मित्रांनो सध्या पॅन कार्डचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. बँक खातं उघडायचं असो की मोबाइलचं सिम कार्ड घ्यायचं असो, सगळीच कामं आता डिजिटल झाली आहेत.
त्या प्रत्येक कामासाठी पॅन कार्डची गरज भासते. त्यामुळे पॅन कार्ड नाही अशी व्यक्ती सहसा आपल्या आजूबाजूला नसते. पॅन कार्ड बाबत सातत्याने नवनवीन नियम सरकारकडून आणले जातात. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची गरज नसल्याचं सांगून सरकारने पॅन कार्ड धारकांना मोठा दिलासा दिला आहे.
हे सुद्धा बघा : सरकारचा मोठा निर्णय.! या शेतकऱ्यांच्या खात्यात सरकार करणार नाही 50 हजार रुपये जमा
पॅन कार्ड हे एक महत्त्वाचं ओळखपत्र आहे. इन्कम टॅक्स विभागाकडून इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 नुसार ते दिलं जातं. त्यावर दिला जाणारा 10 डिजिट्सचा अल्फान्युमरिक कोड हा युनिक असतो आणि त्या पॅनकार्ड धारकासाठी तो आयुष्यभरासाठी लागू असतो. पॅन कार्ड कोणाला मिळतं? याबाबत काही नियम नाहीत. लहान मुलं, विद्यार्थी, सर्व वयोगटातील व्यक्ती पॅन कार्ड काढू शकतात. संस्था आणि कंपन्याही पॅन कार्ड काढू शकतात.