ठिंबक सिंचन अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात झाले जमा इथे बघा यादीत आपले नाव

नमस्कार मित्रांनो सूक्ष्म सिंचन योजनेतून कृषी विभागाकडून बसवलेले ठिबक संचचे अनुदान मंजूर झाल्याने जिल्ह्यातील साडेआठ हजार शेतकऱ्यांना २५ कोटी रुपये लवकरच मिळणार आहेत.

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत तुषार व ठिबक सिंचन योजनेतील साडेआठ हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.२०२३-२४ मधील ठिबक सिंचनचे २५ कोटींचे अनुदान रखडले आहे. या संदर्भात जय किसान फार्मर्स फोरमने जिल्हा कृषी अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.ऑगस्टपर्यंत अनुदान न मिळाल्यास कृषी मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता. ७ सप्टेंबर २०२४ रोजी अनुदान वर्ग होणार असल्याची माहिती कृषी संचालक डॉ. कैलास मोते यांनी दिली. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

हे सुद्धा बघा : राज्य सरकारचा मोठा निर्णय.! 1 नोव्हेंबर पासून सातबारा उताऱ्या मध्ये राज्य सरकार करणारा हा मोठा बदल

Leave a Comment