या तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यात दहा हजार रुपये होणार जमा इथे बघा पात्र शेतकरी यादी

राज्य सरकारने गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये देण्याचा निर्णय जुलैमध्ये जाहीर केल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी अर्थात २९ सप्टेंबरला मदत दिली जाणार आहे.

शेतकरी पुरस्कारांच्या निमित्ताने मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात सुमारे ४२ लाख शेतकऱ्यांना १ हजार ६९० कोटी रुपयांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

हे सुद्धा बघा : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी निधी झाली जाहीर या जिल्ह्यातील शेतकरी असणार पात्र

त्यात सर्वाधिक ३ लाख ६६ हजार ५९ शेतकरी या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे ९२ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने ४ हजार १९४ कोटींचा निधी मंजूर केला असून, पहिल्या टप्प्यात २ हजार ५१६ कोटी रुपये यापूर्वीच कृषी विभागाकडे वर्ग केले आहेत.एकूण शेतकऱ्यांपैकी सुमारे ६६ लाख शेतकऱ्यांनी आधार क्रमांकासह संमतीपत्र दाखल केले आहे. यापैकी ४१ लाख ९९ हजार ६१४ शेतकऱ्यांचे आधार संलग्न बँक खाते नमो किसान सन्मान योजनेतील माहितीशी जुळविण्यात आले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजारांची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हे सुद्धा बघा : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी निधी झाली जाहीर या जिल्ह्यातील शेतकरी असणार पात्र

Leave a Comment