शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! या दिवशी होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा, इथे बघा लाभार्थी यादी

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान तर दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान जारी केला जातो. म्हणजेच 17 व्या हप्त्याचे पैसे एप्रिल ते जून दरम्यान येण्याची शक्यता आहे. सध्या लोकसभा निवडणुकीमुळे देशात आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे हप्त्याचे पैसे जूनमध्येच येतील, असा अंदाज बांधला जात आहे. तर काही सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या काळातच 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.