नमस्कार मित्रांनो राज्यात मागील काही दिवसांपासून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे.
राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत.सरकारच्या या योजनेमुळे राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी आणखी एक मोठी योजना जाहीर केली आहे.
इथे क्लिक करून बघा अर्जप्रकिया
10 हजार महिलांसाठी फायदेशीर
17 शहरांमधील 10 हजार महिलांना या योजनेचा फायदा मिळणार असून या योजनेच्या अंतर्गत रिक्षा खरेदीची २० टक्के रक्कम ही सरकार देणार आहे. महिलांना रोजगार मिळावा या हेतूने सरकारने ही योजना आणली आहे.याबाबत अजित पवार म्हणाले की, “आम्ही महिलांसाठी आणखी एक योजना आणली आहे. गुलाबी रिक्षा असं या योजनेचं नाव असून या योजनेतून 20 टक्के रक्कम महिलेने भरायचे. तर २० टक्के सरकार तर ७० टक्के बँक लोनमधून उपलब्ध करुन दिले जाणार आहे.महाराष्ट्र सरकार जाहीर केलेल्या पिंक ई रिक्षा योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांना ई रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येईल. यासाठी कमाल आर्थिक सहाय्य रु. 80,000/- प्रदान करण्यात येतील.